Me Rajendra Tambat

I was having this long desire which is completed today!!!


हंबरून वासाराले चाटती जवा गाय...
तवा माले  तिच्या  मंधी दिसते माझी माय..
आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
दुष्काळात मायेचा माझे आटला होता पान्हा...
पीठा मंधी, पाणी टाकून, माले पाजत जाय...
तवा माले  पीठा  मंधी दिसते माझी माय..
हंबरून वासाराले ....

तान्या कट्या वेचायला माय जाई रानी
पायांत नसे वाहन तिच्या फिरे अनवानी
कट्या कुट्या लाही तीच  मनात नसे पाय...
तवा माले  कट्या  मंधी दिसते माझी माय..
हंबरून वासाराले ....

बाप माझा रोज लावी माये च्या मांगी  टुन...
बास झाला शिक्षन आता घेऊ दे हाती काम..
शिकून शान, कुठं मोठा, मस्तर होनार हायं..
तवा माले  मस्तर  मंधी दिसते माझी माय..
हंबरून वासाराले ....

 दारू पिऊन मायले मारी जावा माझा बाप
थर थर कापे अंग लागे तिले थाप...
कासयाच्या, दावणी ला बांधली जसी गायं
तवा माले  गायी मंधी दिसते माझी माय..
हंबरून वासाराले...

अन बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पानी...
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसेल रानी
भरल्या डोळ्यात, कवा पाहिलं, दुधावरली सायं..
तवा माले  साई  मंधी दिसते माझी माय..
हंबरून वासाराले...

गं म्हणून म्हणतो आनदाने भरावी तुझी  होटी
पुन्हा एकदा जनम घ्यावा माये तुझे पोटी..
तुझ्या चरणी, ठेवून माया धरावे तुझे पायं
तवा माले  पाया मंधी दिसते माझी माय..
हंबरून वासाराले...

आभार :
कवी नारायण सुर्वे यांनी अनुवाद केलीली  हिंदी कविता
तो मी ओळीत उतरवण्याचा प्रयत्न